Skip to main content

एका सैनिकाचा प्रवास

               लाज वाटती मला या समाजाची !

       बरोबर साडेपाचला बायको घरामध्ये आली आणि अस्वस्थ होत समोर बसली. काय झालयं मला काही कळेना. मी लॅपटॉप बाजूला सारला आणि तिच्याकडं पाहत विचारलं,
"काही बिनसलं का स्कुलमध्ये ?''
त्यावर कोरड्या डोळ्यांनी गॅलरीकडं पाहत म्हणाली,
"काही बिनसलं नाही रे, पण एका गोष्टीचं खुप वाईट वाटलं.''

       हिच्या स्कुलमध्ये नक्की काहीतरी झालं असणार, असा विचार करत मी तिच्याकडं खुर्ची वळवली. तशी ती बोलू लागली,

        "अरे मी स्कुलमधून निघाले, तोच रोड वर एक सैनिक उभा दिसला. अंगावरच्या कपड्यांवरुन ते लक्षात येत होतं. त्याच्या पाठीवर एक आणि हातात दोन बॅगा होत्या. येणाऱ्या गाड्यांना तो हात करत होता. पण, त्याच्या हातातलं सामान पाहून कुणीच थांबत नव्हतं. नेमका तो अशा ठिकाणी उभा होता, की तिथं बस येण्याचा प्रश्‍न नव्हता. म्हणून मी त्याच्यासमोर जाऊन थांबले. तर शेजारच्या गाड्यांवरुन जाणारे पुरुष आणि बायाही माझ्याकडं तिरक्‍या नजरेनं पाहू लागल्या. मी थांबलेली पाहून त्या सैनिकानं विचारलं,
"दिदी कुठपर्यंत जाणार आहात तुम्ही ?''

        मी म्हणाले, "तुम्हाला त्या कॅनॉलपर्यंत सोडू शकते. तिथून तुम्हाला बस मिळेल."

        स्मित करत तो गाडीवर बसण्यास तयार झाला. त्यानं दोन्ही बॅगा स्वत:च्या मांडीवर अशा पद्धतीने घेतल्या की मला त्याचा धक्काही लागणार नाही. तो गाडीवर बसला. पण, रेस वाढवूनही गाडी पुढं सरकत नव्हती. तर त्यानं एका पायानं जोर देत गाडी पुढं ढकलली.

         "कुठून आलात'' असं मी त्याला विचारलं, तर म्हणाला,

         "श्रीनगरवरुन आलोय. स्टेशनवरुन आमची गाडी होती. त्या ट्रकमध्ये कॅन्टोन्मेंटपर्यंत आलो. पण, इथून पुढं जायला बस, रिक्षा काहीच मिळत नव्हतं. म्हणून गाड्यांना हात करत होतो.''

          माझी गाडी आता बऱ्यापैकी धावत होती. स्पीडब्रेकर आल्यावर मी ब्रेक दाबत होते. पण, तो थोडाही पुढं येत नव्हता. उलट त्यानं गाडीचं कॅरियर पकडून धरलं होतं. कॅनॉल येताच मी गाडी थांबवली. तसं मी त्याला स्वत:हून विचारलं की तुम्हाला नेमकं कुठं जायचंयं ? तसा तो म्हणाला, "मी रजाळ्याचा आहे. अडीच वर्षानंतर आलोय. मला भोकरदन ला जायचंय. तिथुन एसटी मिळेल मला." त्यावर मी त्याला म्हणाले की चला मी तुम्हाला भोकरदन ला सोडते. त्याला मोठा आनंद झाला आणि तो पुन्हा त्याच आत्मियतेने गाडीवर बसला. तो बसत असताना मात्र आजुबाजूचे लोक मोठ्या कुतूहलाने माझ्याकडं पाहत होते. काहींना माझा अभिमान वाटत असावा. काहीजण मात्र, गालातल्या गालात कुत्सित हसत होते. एका तरण्याबांड जवानाला मी गाडीवर बसवतीये, अशी काहीतरी घाणेरडी भावना साऱ्या लोकांच्या डोळ्यात होती. तो बिचारा अडीच वर्षांनी त्याच्या घरी आलाय. त्याला लिफ्ट द्यायला एक माणूस थांबत नव्हता. तो तिकडं आपल्या देशाच्या सीमेवर बिनधास्त उभा राहतो, म्हणून आपण हितं निवांत झोपतो आणि मी त्याला लिफ्ट दिली तर हे हरामखोर लोक माझ्याकडं पाहून हसत होते.

काय चुक केली होती रे मी ?

       असं म्हणत बायको रडायलाच लागली. तिला सावरणेही शक्‍य नव्हते. तशी रडक्‍या डोळ्यांनी पुढं बोलू लागली,
"मी त्याला हडपसरला सोडलं, तेव्हा तो काय म्हणाला माहितीये, दिदी आम्हाला चालायची सवय असते. पण, जेव्हा आम्ही चालून थकतो, तेव्हा इथल्या बायातर सोडा, पुरुषही आम्हाला लिफ्ट देत नाहीत. असो.''

        असं म्हणत त्यानं नमस्कार केला आणि बसस्टॉपच्या दिशेने निघून गेला.

        खरोखरच लाज वाटतीये मला या समाजाची !

       असं म्हणत पुन्हा पंधरा मिनिट च बायको फक्त मुसमुसत राहिली. अशा प्रसंगाच्या अनुभवानंतर समजूत तरी घालणार कशी ?

Comments

Popular posts from this blog

गावची जत्रा काय असते?

      गावची जत्रा म्हणजे गावांमधील वार्षिक किंवा विशिष्ट धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने भरवला जाणारा मेळा. हा मेळा गावातील लोकांना एकत्र येऊन आनंद घेण्याची, खरेदी-विक्री करण्याची आणि पारंपरिक कला दर्शवण्याची संधी देतो.    भोकरदन तालुक्यातील नळणी येथील जत्रेतील एक क्षण         खेड्या गावातील शेतकरी वर्षभर काम करून चैत्र महिन्यात थोडे सुखावतात, नंतर पुन्हा त्यांची पेरणीची लगबग सुरू होते. तत्पूर्वी ते गावामधे विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात. कारण जुन्या काळामध्ये करमणुकीचे साधन म्हणून फक्त जत्राच होती गावातील जत्रा असल्यावर बाहेरून पाहूने यायचे. काही गावच्या यात्रा तर हळू हळू इतक्या प्रसिद्ध झाल्या की आजतागायत त्याचे अस्तित्व टिकून आहेत... आजच्या व्हिडिओ मधे आधुनिक गावाच्या जत्रांमधील हा व्हिडिओ तुमच्यासाठी प्रसिद्ध केला आहे. आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका... व्हिडिओ ची लिंक 🖇️ गावची जत्रा काय असते? संग्रह आणि मनोरंजनाचे केंद्र: जत्रा एकप्रकारे गावाचे सांस्कृतिक आणि सामा...

श्री आदि भूतनाथ बाबा धाम मंदिर कोलकाता , जिथे दररोज जळत्या चितेच्या अग्निने आरती पेटवली जाते.

        भोले नाथाच अस मंदिर जेथे आरतीचे दिवा लावण्यासाठी दररोज चितेच्या अग्नीचा वापर केला जातो. हे मंदिर (भूतनाथ मंदिर कोलकाता) बारा ज्योतिर्लिंगांमध्ये समाविष्ट नाही, परंतु तरीही येथे आरतीची ज्योत चितेच्या लाकडाने प्रज्वलित केली जाते. बाबा भूतनाथ मंदिर कोलकाता       हे रहस्यमय मंदिर (भूतनाथ मंदिर कोलकाता) कोलकाता येथील नीमतल्ला घाटाजवळ आहे जे बाबा भूतनाथ मंदिर किंवा बाबा भूतनाथ म्हणून ओळखले जाते. या मंदिराची स्थापना 300 वर्षांपूर्वी नीमतल्ला स्मशानभूमीत राहणाऱ्या एका अघोरी बाबाने केली होती, असे सांगितले जाते.      ज्या वेळी या मंदिराची स्थापना झाली, त्या वेळी येथे एकच शिवलिंग होते ज्यावर अनेक अघोरी बाबा जल अर्पण करून पूजा करण्यासाठी येत असत आणि काही वेळा आजूबाजूचे लोकही शिवलिंगाला जल अर्पण करण्यासाठी येत असत. असे सांगितल्या जाते.          आता या मंदिरात (भूतनाथ मंदिर कोलकाता) पूजेच्या वेळी चितेच्या अग्नीतून ज्योत का पेटवली जाते याकडे येऊ. वास्तविक, स्मशानभूमीच्या मध्यभागी अघोरी बाबांनी शिवलि...

चांदनी चौक कोलकाता संपूर्ण माहिती, ऐतिहासिक मार्केट चोर मार्केट म्हणून सुद्धा ओळख.

चांदणी चौक मार्केट  व्हिडिओ जुन्या वस्तू चें दुकान          चांदनी चौक हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता जिल्ह्यातील उत्तर कोलकाता येथील एक परिसर आहे. हे संगणक सॉफ्टवेअर उत्पादने आणि हार्डवेअरच्या सेकंड-हँड आणि स्वस्त बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे चांदणी चौक मार्केट मधील संध्याकाळची गर्दी. इतिहास:- चांदनी चौक, उत्तर कोलकातामधील एक व्यावसायिक केंद्र आणि बाजारपेठ आहे. ही बाजापेठ 1784 च्या सुरुवातीला अस्तित्वात आली. ह्या कलकत्त्याच्या या बाजाराला अनेक नावाने ओळखले जाते जसे की, "चांदनी चौक बाजार", "चांदनी बाजार स्ट्रीट", "चांदनी चौक" किंवा "गोरीमार लेन" असे. कोलकाता महानगरपालिकेच्या नोंदी मधे असे सांगितले आहे की, 1937 पूर्वी, स्थानिक लोक गुरियामा लेन म्हणून या बाजाराला ओळखत आसे. चांदणी चौकचा जुना फोटो (सौ. गुगल)      डब्ल्यू.एच. कैरी (W.H. Carey) असे म्हणतात की, दुकानावर बनवलेल्या छत्र्या आणि छोटे छोटे दुकाने असल्याने आणि याला बंगाली मध्ये चदना म्हणत असल्याने याचे नाव चांदणी मार्केट पडले असावे. कोलकात्याचे सुप्रसिद्ध फिल्म प्रो...