👇( नक्की वाचा )👇
माझे नुकतेच लग्न झाले होते. मी मे महिन्याच्या अश्याच एका गरम दुपारी आपल्या वडिलांसोबत थंडगार उसाचा रस पीत बसलो होतो. 'मे' मध्ये माझे लग्न झाले होते आणि माझ्या वडिलांनी माझ्यात झालेले बदल अनुभवले होते. मी मित्रांना पाहुण्या राऊळ्यांना टाळत होतो, भेटी कमी झाल्या होत्या. बायको सोबत गुलुगुलु बोलणे हा माझा आवडीचा विषय झाला होता.....
रस पितांना वडील म्हणाले, अरे मी सांगतो मित्रांना भेटत जा, त्यांना टाळू नकोस. जसे तुझे वय वाढेल तशी तुला मित्रांची जास्त गरज भासेल...
मला जरा गंमतच वाटली. माझ लग्न झाले होते आणि आम्ही दोघेही adult होतो, आम्ही परिवार सुरू करणार होतो, आणि माझा परिवार माझी काळजी घेणार हे मला माहीत होते. पण तरीही मी वडिलांचा सल्ला मानला. आज लग्नाच्या अनेक वर्षांनंतर मला काही गोष्टी रियालाईझ झाल्या आहेत.
१.पैसे आले आणि गेले
२.खराब वेळ आली गेली
३.पिल्ले घरट्यातून उडून गेली
४.नोकरी गेली आणि परत मिळाली
५.भौतिक आकर्षणे कमी झाली
६.आप्त गेले
७.आयुष्याशी रॅट रेस संपली
८.धावायची इच्छा कमी झाली
सगळं बदललं पण बदलेले नाहीत. सुरेश सुऱ्या च राहिला, मध्याचा मधू तर अजिबात झाला नाही, सतिष ला तर जेण्या म्हणून बोलल्याशिवाय करमतच नाही. बळ्याला पूर्ण नावाने तर कधीच हाक मारली नाही , काळू रंगाने गोरा झाला पण त्याच काही नाव बदललं नाही. अजुन असे कितीतरी मित्र आहेत ज्यांना त्यांच्या टोपण नावानेच आम्ही आजही ओळखतो……..
आम्ही सगळे एकत्र धावलो, काही मागे राहिले तर काही रेस जिंकले पण मॉडेल हिरो आम्ही सगळेच होतो.
आईवडिल, भाऊ बहीण, लेकरं यांची काळजी तर घ्याच पण मित्रांना जपा. सच्चे मित्रच तुमचे असतात, कारण त्यांना "अबे तू पागल है" हे सांगायला कोणतेही दडपण नसते..
🙏🙏🙏🙏🙏🙏
गावची जत्रा म्हणजे गावांमधील वार्षिक किंवा विशिष्ट धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने भरवला जाणारा मेळा. हा मेळा गावातील लोकांना एकत्र येऊन आनंद घेण्याची, खरेदी-विक्री करण्याची आणि पारंपरिक कला दर्शवण्याची संधी देतो. भोकरदन तालुक्यातील नळणी येथील जत्रेतील एक क्षण खेड्या गावातील शेतकरी वर्षभर काम करून चैत्र महिन्यात थोडे सुखावतात, नंतर पुन्हा त्यांची पेरणीची लगबग सुरू होते. तत्पूर्वी ते गावामधे विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात. कारण जुन्या काळामध्ये करमणुकीचे साधन म्हणून फक्त जत्राच होती गावातील जत्रा असल्यावर बाहेरून पाहूने यायचे. काही गावच्या यात्रा तर हळू हळू इतक्या प्रसिद्ध झाल्या की आजतागायत त्याचे अस्तित्व टिकून आहेत... आजच्या व्हिडिओ मधे आधुनिक गावाच्या जत्रांमधील हा व्हिडिओ तुमच्यासाठी प्रसिद्ध केला आहे. आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका... व्हिडिओ ची लिंक 🖇️ गावची जत्रा काय असते? संग्रह आणि मनोरंजनाचे केंद्र: जत्रा एकप्रकारे गावाचे सांस्कृतिक आणि सामा...
Comments
Post a Comment