Skip to main content

गावाकडच्या गोष्टी (गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी)

        शाळा  सुटल्यावर चड्डीवर कर्दुडा चढवून या असल्या मग्रुर ऊन्हात भर दुपारी बारा वाजता टाकळी च्या गाडीवाटेनं पायात चपला न घालता बैलगाडीच्या चाकाचा  फुफोटा उडवत शेतात चालत जायचो.
चालता चालता त्याच फुफाटयातला बाबळीचा निबरढोक जुना काटा काचदिशी पायात मोडून मस्तकात कळ जायची.मोडलेला काटा काढायला काटयाची फांदी शोधत लंगडत भीरी भीरी हिंडायचो.

(तिथंच शिकलो काट्याने काटा काढायचा )
तिथंच  रस्त्याकडेला  मांडी घालुन पायाला थुंकी लावून काटा काढायला घ्यायचो.
काढलेला काटा तळहातावर घेवून पापणीचा केस खसकन तोडायचो.

तोडलेला पापणीचा केस काटयाला चिकटवून हळूहळू वर ऊचलायचो..
काटा ऊचलून वर यायचा...भारी वाटायचं
तेव्हा पापणीच्या केसानेही वेदना हलकी व्हायची, काटयासारखी... कारण तेव्हा व्यवहाराचा स्पर्श नं झालेली निरागस स्वप्नं होती ह्या डोळ्यात..ऊन्ह तेव्हाही होतंच इतकाच होत..आता डोक्याला टोपी डोळ्यावर गॉगल चढवूनही ऊन लागतं. भौतिकाची बाधा झाली की, सावलीही सळू लागते.
ऊन्हाची तर गोष्टच वेगळी आहे मित्रांनो....
जय हिंद
                            
    

Comments

Popular posts from this blog

गावची जत्रा काय असते?

      गावची जत्रा म्हणजे गावांमधील वार्षिक किंवा विशिष्ट धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने भरवला जाणारा मेळा. हा मेळा गावातील लोकांना एकत्र येऊन आनंद घेण्याची, खरेदी-विक्री करण्याची आणि पारंपरिक कला दर्शवण्याची संधी देतो.    भोकरदन तालुक्यातील नळणी येथील जत्रेतील एक क्षण         खेड्या गावातील शेतकरी वर्षभर काम करून चैत्र महिन्यात थोडे सुखावतात, नंतर पुन्हा त्यांची पेरणीची लगबग सुरू होते. तत्पूर्वी ते गावामधे विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात. कारण जुन्या काळामध्ये करमणुकीचे साधन म्हणून फक्त जत्राच होती गावातील जत्रा असल्यावर बाहेरून पाहूने यायचे. काही गावच्या यात्रा तर हळू हळू इतक्या प्रसिद्ध झाल्या की आजतागायत त्याचे अस्तित्व टिकून आहेत... आजच्या व्हिडिओ मधे आधुनिक गावाच्या जत्रांमधील हा व्हिडिओ तुमच्यासाठी प्रसिद्ध केला आहे. आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका... व्हिडिओ ची लिंक 🖇️ गावची जत्रा काय असते? संग्रह आणि मनोरंजनाचे केंद्र: जत्रा एकप्रकारे गावाचे सांस्कृतिक आणि सामा...

श्री आदि भूतनाथ बाबा धाम मंदिर कोलकाता , जिथे दररोज जळत्या चितेच्या अग्निने आरती पेटवली जाते.

        भोले नाथाच अस मंदिर जेथे आरतीचे दिवा लावण्यासाठी दररोज चितेच्या अग्नीचा वापर केला जातो. हे मंदिर (भूतनाथ मंदिर कोलकाता) बारा ज्योतिर्लिंगांमध्ये समाविष्ट नाही, परंतु तरीही येथे आरतीची ज्योत चितेच्या लाकडाने प्रज्वलित केली जाते. बाबा भूतनाथ मंदिर कोलकाता       हे रहस्यमय मंदिर (भूतनाथ मंदिर कोलकाता) कोलकाता येथील नीमतल्ला घाटाजवळ आहे जे बाबा भूतनाथ मंदिर किंवा बाबा भूतनाथ म्हणून ओळखले जाते. या मंदिराची स्थापना 300 वर्षांपूर्वी नीमतल्ला स्मशानभूमीत राहणाऱ्या एका अघोरी बाबाने केली होती, असे सांगितले जाते.      ज्या वेळी या मंदिराची स्थापना झाली, त्या वेळी येथे एकच शिवलिंग होते ज्यावर अनेक अघोरी बाबा जल अर्पण करून पूजा करण्यासाठी येत असत आणि काही वेळा आजूबाजूचे लोकही शिवलिंगाला जल अर्पण करण्यासाठी येत असत. असे सांगितल्या जाते.          आता या मंदिरात (भूतनाथ मंदिर कोलकाता) पूजेच्या वेळी चितेच्या अग्नीतून ज्योत का पेटवली जाते याकडे येऊ. वास्तविक, स्मशानभूमीच्या मध्यभागी अघोरी बाबांनी शिवलि...

चांदनी चौक कोलकाता संपूर्ण माहिती, ऐतिहासिक मार्केट चोर मार्केट म्हणून सुद्धा ओळख.

चांदणी चौक मार्केट  व्हिडिओ जुन्या वस्तू चें दुकान          चांदनी चौक हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता जिल्ह्यातील उत्तर कोलकाता येथील एक परिसर आहे. हे संगणक सॉफ्टवेअर उत्पादने आणि हार्डवेअरच्या सेकंड-हँड आणि स्वस्त बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे चांदणी चौक मार्केट मधील संध्याकाळची गर्दी. इतिहास:- चांदनी चौक, उत्तर कोलकातामधील एक व्यावसायिक केंद्र आणि बाजारपेठ आहे. ही बाजापेठ 1784 च्या सुरुवातीला अस्तित्वात आली. ह्या कलकत्त्याच्या या बाजाराला अनेक नावाने ओळखले जाते जसे की, "चांदनी चौक बाजार", "चांदनी बाजार स्ट्रीट", "चांदनी चौक" किंवा "गोरीमार लेन" असे. कोलकाता महानगरपालिकेच्या नोंदी मधे असे सांगितले आहे की, 1937 पूर्वी, स्थानिक लोक गुरियामा लेन म्हणून या बाजाराला ओळखत आसे. चांदणी चौकचा जुना फोटो (सौ. गुगल)      डब्ल्यू.एच. कैरी (W.H. Carey) असे म्हणतात की, दुकानावर बनवलेल्या छत्र्या आणि छोटे छोटे दुकाने असल्याने आणि याला बंगाली मध्ये चदना म्हणत असल्याने याचे नाव चांदणी मार्केट पडले असावे. कोलकात्याचे सुप्रसिद्ध फिल्म प्रो...